Lokmat International News | अकल बडी के भैंस बडी, ह्या चोरांसाठी भैस बडी | Crime Story | Marathi News

2021-09-13 1

शांघाय मधली एक बँक लुटण्यासाठी दोन चोर तोंडाला मास्क लावून दाखल झाले.बँकेच्या दाराशी लावलेला सीसीटीव्ही त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होता. एका चोरानं एक वीट हातात घेतली आणि बँकेच्या दाराशी फेकून मारली. दुसऱ्या चोरानंही त्याचीच कॉपी केली.आणि नेम धरून वीट फेकली.पण हाय रे चोराचं दुर्दैव.चुकून ही वीट पहिल्या चोराच्या डोक्यात पडली.हा वार इतका जोरदार होता की वीट डोक्यात बसताक्षणीच पहिला चोर जागच्या जागी कोसळला. आणि वीट फेकणाऱ्या चोराचे धाबे दणाणले.चोरीचा प्लान कॅन्सल करून पहिल्या चोराला उचलून त्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागला. चोर असाच मुर्खपण करत राहिले तर आमचं काम सोप्पं होईल, असं ट्विट करत शांघाय पोलिसांनीच हा मजेशीर प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires